21 व्या शतकात ज्ञान हेच भांडवल: प्राचार्य डॉ. मधुकर आघाव

परळी वैजनाथ:  येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ आघाव बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की जुन्या काळातील युद्धाचे साहित्य आज वापरून चालणार नाही आज माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे लढाईची साधने बदललेली आहेत. ज्ञान हे मुख्य भांडवल आहे, ज्ञान हेच हत्यार आहे. या नवयुगातील ज्ञानात्मक साधनांचा आपण उपयोग करायला शिकले पाहिजे. महाविद्यालयांमध्ये यावेळी शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी भाषणे केली तसेच डॉ आघाव यांची नुकतीच प्राचार्य पदी नियुक्ती केल्यामुळे महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने आणि विद्यार्थ्यांतर्फे त्यांचा स्वागत सत्कार करण्यात आले. यावेळी परळी शहर आणि परिसरातील राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांनीही डॉ आघाव यांच्या निवडीबद्दल सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपप्राचार्य डॉ लालासाहेब घुमरे व डॉ दयानंद कुरुडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना लेखणीची भेट देऊन त्यांचे स्वागत केले. महाविद्यालयाचे सहकारी प्रा. घोलप यांची कन्या सुहानी चा mbbs साठी निवड झाल्याबद्दल त्यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला. यावेळी माजी प्राचार्य डॉ आर एस बांगड, माजी उपप्राचार्य आर के बोबडे, श्री घुगे साहेब, डॉ अनिल घुगे, श्री चंद्रकांत उदगीरकर, वैद्यनाथ बँकेचे संचालक महेशआप्पा निर्मळे, परळी शहरातील पत्रकार बांधव व सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा मोगरे यांनी केले तर आभार शहाबाज पठाण यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

सूत्रसंचालन कसे करावे भाग १

शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी करत शिक्षणाची संधी उपलब्ध __प्राचार्य डॉ मधुकर आघाव

आ.विक्रम काळे यांच्या हस्ते डॉ.मधुकर आघाव यांचा नवगण महाविद्यालयाच्या प्राचार्यपदीनिवडीबद्दल सत्कार