Posts

शिक्षकांसाठी काही आवश्यक गुणवैशिष्ट्ये

Image
*शिक्षकांसाठी काही आवश्यक गुणवैशिष्ट्ये*  प्राचीन काळापासून शिकणे अणि शिकवण्याचे कार्य चालत आलेले आहे. प्राचीन काळात शिक्षकाला अत्यत उच्च स्थान होते. शिक्षकाला ईश्वरासमान मानले गेले होते. शिक्षकांनी आपल्या शिष्यांना बौद्धिक योग्यतेच्या विशिष्ट मानदंडापर्यन्त पोहचवावे अशी अपेक्षा केली जाई. शिष्य आपल्या शिक्षकाचेच प्रतिक्वि असतो. म्हणूनच शिक्षकाचे आचरण आणि चारित्र्य श्रेष्ठ दर्जाचे असे. आपल्या कर्तव्यात ते सतत जागरूक असत. आदर्श शिक्षक हा ज्ञानपिपासू असे. पण शिक्षकाचे कार्य प्रामुख्याने धर्माचा उपदेश हेच असे. पाठ्यांश्याचे वाचन, मनन, चिंतन आणि पाठांतरला प्राधान्य असे. आजच्या सतत बदलत्या समाजात शिक्षकाचे महत्त्व खूपच वाढले आहे. मुला-मुलींचा केवळ मानसिक विकास करणे इतके मर्यादित कार्य शिक्षकाचे आज नाही. मुला-मुर्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण, सर्वस्पर्शी, समतोल असा विकास घडवून आणावयाचा आहे. शारीरिक, नैतिक, भावनात्मक, सामाजिक, मानसिक आणि आध्यात्मिक अंगांनी मुला-मुलींचा विकास घडवायचा आहे. त्यांच्यात सामाजिक कौशल्ये निर्माण करावयाची आहेत. समाजाचा जवाबदार घटक आणि राष्ट्राचे न...

विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक तयारीसाठी स्वतःला सक्षम करावे : एपीआय योगेश शिंदे

परळी वैजनाथ : महाविद्यालयीन अभ्यासक्रमाचे व व्यावसायिक शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक तयारीसाठी स्वतः सक्षम व्हावे आणि वाचन आणि आवातर अभ्यासातही रुची निर्माण करावी असे मत परळी शहर पोलीस स्टेशनचे एपीआय योगेश शिंदे यांनी व्यक्त केले. नवगण महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की आज स्पर्धात्मक युगामध्ये व्यावसायिक शिक्षण महत्त्वाचे आहे तितकेच अतिशय कौशल्याने स्पर्धात्मक तयारी करणे ही महत्त्वाचे आहे. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ एम जी राजपांगे, श्री बाळासाहेब देशमुख, उपप्राचार्य डॉ लालासाहेब घुमरे,प्रमुख श्री दत्ता गित्ते, श्री मदणे साहेब इत्यादींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य श्री बाळासाहेब देशमुख यांनी महाविद्यालयाची इतिहास आणि परंपरा सांगत असतानाच विद्यार्थ्यांच्या उपस्थिती आणि सांस्कृतिक अभिरुची विषयी मार्मिक भाष्य केले. प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांच्या  हस्ते सांस्कृतिक विभाग आणि क्रीडा विभागाच्या विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रम आणि कलागुना...