डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध स्पर्धांचे आयोजन

_परळी वैजनाथ_ : लोकप्रिय नेते तथा बीड चे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या 64 व्या वाढदिवसानिमित्त परळी येथील नवगण महाविद्यालयामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
दिनांक 17 फेब्रुवारी रोजी डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचा वाढदिवस जिल्हाभरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होत असल्याने येथील नवगण महाविद्यालयामध्ये दिनांक 15,16 व 17 रोजी वक्तृत्व स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व सामान्य ज्ञान स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले तसेच संगीत विभागाच्या वतीने अभंग वाणी व गीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. एम.जी राजपांगे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या आणि पेनांचे वाटप करण्यात आले. जिल्हाभरामध्ये विविध शैक्षणिक संस्थांचे जाळे विणून त्यांनी ग्रामीण भागामध्ये शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत त्यांना दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला.

Comments

Popular posts from this blog

भाऊ : नात्यागोत्यांचे समन्वयक

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे