नवगण महाविद्यालयात इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी, पेटंट व ट्रेडमार्क या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा


परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये आज बौद्धिक संपदा व ट्रेडमार्क,पेटंट, डिझाइन्स या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. 
कार्यक्रमात पेटंट ऑफिसर अतुल खाडे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना बौद्धिक संपदा आणि आपल्या वेगळ्या कला कौशल्यांची नोंदणी कशी करावी याविषयी माहिती दिली. प्राध्यापकांनीही आपल्या नाविन्यपूर्ण संशोधनाची नोंद व योग्य काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी नोंदविले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य कॅप्टन डॉ. एम.जी. राजपांगे यांनी प्रादेशिक वेगळेपणाचे स्वामित्व हक्क कसे मिळवावे आणि ते संरक्षित कसे करावे याविषयी माहिती सांगितली. तसेच नवगण महाविद्यालयातील डॉ. घोलप यांच्याकडे भारत सरकारच्या बौद्धिक विभागाचे एक कॉपीराईट आणि दोन रजिस्टर ट्रेडमार्क आहेत याविषयी आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक आयक्वेक कॉर्डिनेटर डॉ महेश दाडगे यांनी व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ मिलिंद सोनकांबळे यांनी व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

भाऊ : नात्यागोत्यांचे समन्वयक

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे