स्वतःच्या तंत्राचा विकास केला तरच आपल्या स्वातंत्र्याला अर्थ येईल : डॉ. नयनकुमार आचार्य


परळी वैजनाथ : तरुणांना उद्या च्या सक्षम आणि तंत्रज्ञानाने संपन्न भारताचा विकास करावयाचा आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळून बरीच वर्षे झाली परंतु स्वतंत्राची आणि स्वतःची खरी खुरी ओळख असल्याचा जेव्हा आपल्याला प्रत्यय येईल तेव्हाच भारत महासत्ता बनू शकेल असे मत डॉ. नयन कुमार आचार्य यांनी येथील नवगण महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
परळी वैजनाथ येथील नवगण महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीआय श्री मुंडे साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ राजपांगे, डॉ. महेश दाडगे, डॉ प्रकाश फड इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ. नयनकुमार आचार्य यांनी तरुणांना प्रेरक व व स्फूर्तीदायक मार्गदर्शन केले तर पोलीस निरीक्षक श्री मुंडे साहेब यांनी अनुभवातून विद्यार्थ्यांनी सद्गुण आणि सदाचार कसे अंगीकारावेत आणि कायद्याचे पालन करून प्रामाणिकपणे कसे जगावे याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. राजपांगे यांनी बऱ्याच दिवसानंतर कोविड कालावधी संपवून आता सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्नेहसंमेलनामुळे तरुणाई मध्ये उत्साह आला आहे याचे समाधान व्यक्त केले. दिनांक 14 15 व 16 रोजी स्नेहसंमेलन निमित्त विविध क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बापू घोलप यांनी व आभार प्रा. राहुल सोनवणे यांनी व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

भाऊ : नात्यागोत्यांचे समन्वयक

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे