नवगण महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू


परळी वैजनाथ:  येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये दि 20 पासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात विविध प्रलंबित मागण्यासाठी कार्यालय अधीक्षक श्री अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत काम बंद आंदोलनास सुरुवात केले.

राज्य शासन जाणीवपूर्वक महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मागणी डावलीत आहे तरी प्रामुख्याने आश्वासित प्रगती योजनेचा लाभ पूर्ववत करून सातवा वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चिती करावी. 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करावी. 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देण्यात यावी. महाविद्यालयातील रिक्त पदांची भरती करण्यात यावी. सातवा वेतन आयोगाच्या तरतुदीनुसार 10, 20, 30 वर्षानंतर लाभाची योजना विद्यापीठीय व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करावी. या प्रमुख मागण्यांसाठी येथील कर्मचाऱ्यांनी घोषणा देऊन आंदोलन केले . सदर बेमुदत काम बंद आंदोलनामध्ये श्रीमती खडके एस सी, इंदुरकर एस पी, सय्यद अख्तर, रोडे एस आर, बेदरकर डी एन, आळसे बी एम, कांबळे एस वाय इत्यादी सह विद्यार्थी व प्राध्यापक वृंदांनी ही त्यांना पाठिंबा दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

भाऊ : नात्यागोत्यांचे समन्वयक

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे