शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी करत शिक्षणाची संधी उपलब्ध __प्राचार्य डॉ मधुकर आघाव
परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र असून येथे बीए, बीकॉम व एमबीए करण्यासाठी विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी आहे तरी विद्यार्थ्यांनी या शिक्षणाचा लाभ घ्यावा व प्रवेशासाठी संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मधुकर आघाव यांनी केले आहे. नवगण महाविद्यालयामध्ये मुक्त विद्यापीठासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकांची सुविधा देण्यात येते तसेच मार्गदर्शन वर्ग देखील घेण्यात येतील त्याचप्रमाणे नोकरी करत असताना दर्जेदार शिक्षण व पदवी मिळविण्याचे ही सुवर्णसंधी आहे. ग्रामीण भागातील अर्धवेळ नोकरी करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा व प्रवेशासाठी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेशासाठी आपण डॉ आघाव 9423844444 डॉ मोहिते 9421339343 डॉ आचार्य 9423716114 डॉ वानखेडे 9421336952 डॉ धायगुडे 9850734463 डॉ शिरसाट 9511874921 डॉ घुमरे 9823567335 श्री साखरे 9423471921 यांच्याशी संपर्क साधावा.
Comments
Post a Comment