Posts

नवीन शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर नवगण महाविद्यालयात चर्चासत्र संपन्न

Image
परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर प्रमुख व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली चर्चासत्र संपन्न झाले. यावेळी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आचार्य सानंदजी यांनी सांगितले की मानवाचे जीवन सुखकर बनविण्यासाठी मानवाने वेदांचा अभ्यास केला पाहिजे तसेच तसेच पुराणातील विविध संस्कृत संज्ञा आणि संकल्पनांचा सखोल अर्थ त्यांनी सांगितला. यावेळी श्री लक्ष्मण हुलगुंडे गुरुजी यांनी मराठी साहित्यातील विविध काव्यपंक्तीच्या आधारे विद्यार्थ्यांना नैतिक शिक्षण आणि आदर्शांची मांडणी कशी असावी यासंबंधीचे मार्गदर्शन केले. आजच्या शैक्षणिक धोरणामध्ये अशा मूल्यांची पेरणी करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ मधुकर राजपांगे यांनी निसर्गाची शक्ती हेच ईश्वराचे खरे रूप आहे व विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा वसा उराशी बाळगताना या निसर्गाच्या रूपाची प्रचिती अनुभवली पाहिजे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनईपीचे नोडल अधिकारी प्रोफेसर डॉ. ...

नवीन जागतिक आव्हाने पेलण्यासाठी NEP 2020 चे धोरणे उपयुक्त- डॉ विनोद गायकवाड

Image
परळी वैजनाथ : नवीन शैक्षणिक धोरण 2020 हे जागतिक स्तरावरील आव्हाने पेलण्यासाठी आणि कौशल्य विकास आधारित नवीन पिढीच्या निर्मितीसाठी उपयुक्त असल्याचे मत येथील वैद्यनाथ महाविद्यालयाचे प्रा गायकवाड यांनी व्यक्त केले नवगण महाविद्यालयामध्ये आज नवीन शैक्षणिक धोरणाची रूपरेषा मांडणी आणि येत्या वर्षात होणारी नवीन शैक्षणिक वर्षाची अंमलबजावणी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी प्रा गायकवाड यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची स्लाईड शोच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने उच्च शिक्षणासाठी त्याची कशाप्रकारे अंमलबजावणी केली जाणार आहे याचीही माहिती दिली यावेळी अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य कॅप्टन डॉ एम जी राजपांगे यांनी प्राध्यापकांनी आणि पालक, विद्यार्थ्यांनीही नवीन शैक्षणिक धोरणाची संरचना समजून घ्यावी आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी तयार व्हावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक या विभागाचे प्रमुख प्रोफेसर डॉ प्रकाश फड यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रोफेसर डॉ अर्चना परदेशी यांनी केले व आभार डॉ रवींद्र मचाले यांनी व्यक्...

भाऊ : नात्यागोत्यांचे समन्वयक

Image
बंकटस्वामी महाविद्यालय बीड चे उपप्राचार्य प्रा. बन्सी काळे हे आपल्या 33 वर्षाच्या सेवेनंतर 31 जुलै रोजी निवृत्त होत आहेत. त्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा व स्वभावाचा परामर्श घेणारा विशेष लेख प्रा. बन्सी गणपतराव काळे आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. गेल्या 33 वर्षांमध्ये त्यांनी बंकटस्वामी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक, पर्यवेक्षक आणि उपप्राचार्य पदावर आपली सेवा सचोटीने पूर्ण केली. मित्रहो वास्तविक बंकटस्वामी महाविद्यालयाचा आणि माझा तसा विशेष शैक्षणिक संबंध नाही. मी बलभीम महाविद्यालयाचा विद्यार्थी होतो आणि आदरणीय डॉ दीपाताई क्षीरसागर यांनी के एस के महाविद्यालय मध्ये मला नोकरी दिली. मात्र बंकटस्वामी मध्ये असणारे भाऊ हे माझे शालेय जीवनापासूनचे महाविद्यालय आहेत. ते आमचे विद्यापीठही आहेत. आज सेवानिवृत्तीच्या निमित्ताने मी त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीचा उहापोह करण्यापेक्षा माझ्या दृष्टीने व उपस्थित असलेल्या सर्व नातेवाईकांच्या स्नेही जणांच्या वतीने नात्यातले भाऊ व्यक्त करतो. भाऊ या शब्दाला आपल्या संस्कृतीत आदर आहे. आपुलकी आहे. आपलेपणा आहे. आम्ही आदराने प्रा बी जी क...

नवगण महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी डॉ. महेश दाडगे यांची नियुक्ती

Image
परळी वैजनाथ:  येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये कार्यरत असणारे संगीत विभाग प्रमुख डॉ महेश शामराव दाडगे यांची नुकतीच संस्थेने उप प्राचार्य पदी नियुक्ती केली आहे. संगीत विषयांमध्ये यूजीसी नेट परीक्षा पास असणारे प्रोफेसर दाडगे हे गेल्या 18 वर्षापासून महाविद्यालयामध्ये कार्यरत असून वेगवेगळ्या समित्यांमध्ये त्यांनी उत्कृष्ट काम केलेले आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल संस्थेचे मार्गदर्शक मा जयदत्त अण्णा क्षीरसागर, संस्थेचे सचिव डॉ भारतभूषण क्षीरसागर, संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ दीपाताई क्षीरसागर, युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर, प्राचार्य कॅप्टन डॉ मधुकर राजपांगे यांच्यासह संस्था पदाधिकाऱ्यांनी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी इत्यादीनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Ai आर्टिफिशियल इंटेलिजन्स थीम

Dear Researcher’s, Conference Tracks Track 1: Artificial Intelligence, Machine Learning & Data Science Track 2: Information Technology Track 3: Big Data Analytics & Visualization Track 4: Communication Track 1: Artificial Intelligence, Machine Learning & Data Science Case-Based Reasoning and Learning, Classification and Clustering, Deep Learning, Inductive Learning, Inference Rule Learning, Learning and Adaptive control, Real Time Event Learning and Detection, Natural Language Processing, Similarity Measures and Learning of Similarity Statistical and Evolutionary Learning, Soft Computing, Image Processing and Computer Vision, Internet of Things, Virtual Reality and Augmented Reality, Data Modeling & Semantic Engineering, High Performance Scientific/Engineering/ Commercial Applications, Info science & Computational Informatics, Information Network Analytics, Data Science Techniques for Handling, Epidemic and Pandemic Situations, Time Series and ...

केंद्रप्रमुख विभागीय भरती 2023

*केंद्रप्रमुख 2384 पदांची जाहिरात प्रसिद्ध, शिक्षकांना 15 जून 2023 पर्यंत अर्ज करता येणार ; परीक्षा ऑनलाइन व नवीन अभ्यासक्रमानुसार होणार* महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांना 2384 रिक्त केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धापरीद्वारे नियुक्ती देण्यासाठी "केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३" या परीक्षेचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने जून २०२३ च्या शेवटच्या आठवडयात आयोजन करण्यात आले आहे. *अर्ज करण्याची मुदत* ऑनलाईन प्रणालीव्दारे दि. 6 जून 2023 ते 15 जून 2023 या कालावधीत अर्ज करता येतील. *केंद्रप्रमुख परीक्षा माहितीची लिंक* www.mscepune.in *केंद्रप्रमुख अर्ज लिंक* https://ibpsonline.ibps.in/mscepapr23 *परीक्षा शुल्क* 1.सर्व संवर्गातील उमेदवार - 950 रुपये 2.दिव्यांग उमेदवार - 850 रुपये *केंद्रप्रमुख पदासाठी अर्हता* विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम / बी.एस.सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आह...

नागराज मंजुळे : साहित्यआणि चित्रपट विशेषांक

Image
खालील विषयावर अभ्यासकांनी विद्यावार्ता त्रैमासिकासाठी शोधनिबंध पाठवावेत  1) नागराज मंजुळे यांच्या कवितेचे वेगळेपण  2) पटकथा लेखक नागराज मंजुळे 3) दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे सामाजिक भान 4) चित्रपट निर्माता : नागराज मंजुळे 5) अभिनेता : नागराज मंजुळे 6) चित्रपट अभ्यासक नागराज मंजुळे 7) नागराज मंजुळे यांचे चित्रपट : चर्चा आणि चिकित्सा 8) चित्रपट माध्यमचे भान असणारा दिग्दर्शक: नागराज मंजुळे  9) भारतीय समाजाचे वास्तव प्रश्न : चित्रपट निर्मितीचे राजकारण  10) नागराज मंजुळे यांची भूमिका : सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, साहित्यिक आदी.या व्यतिरिक्त वेगळे विषय असू शकतात .