परळीतील विद्यार्थिनीची औरंगाबाद विद्यापीठाच्या हॉलीबॉल आंतर विद्यापीठीय क्रीडा संघामध्ये निवड

नवगण महाविद्यालय परळीची विद्यार्थिनी मोनिका जमदाडे हिची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुलींच्या हॉलीबॉल संघामध्ये अंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेकरिता निवड झालेली आहे. नवगण महाविद्यालयांमध्ये विविध क्रीडा प्रकारांकरिता मार्गदर्शन आणि नियमित सराव घेण्यात येतो. क्रीडांगणसह सर्व सुविधांनी संपन्न असलेल्या या महाविद्यालयांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळाच्या सुविधा पुरविण्यात येतात. याचेच फलित म्हणून विद्यापीठीय व राज्यस्तरीय संघामध्ये येथील विद्यार्थ्यांची निवड होते असे मत प्राचार्य डॉ एम.जी.राजपांगे यांनी यावेळी व्यक्त केले. कु.मोनिकाच्या यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शक जयदत्त अण्णा क्षीरसागर तसेच संस्थेचे सचिव डॉ.भारतभूषण क्षीरसागर , संस्थेच्या उपाध्यक्ष प्राचार्य डॉ . दीपाताई क्षीरसागर , युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर , प्राचार्य डॉ .कॅप्टन एम.जी. राजपांगे क्रीडा विभाग प्रमुख डॉ.रवींद्र मचाले, डॉ. उध्दवराव मुळे व सर्व प्राध्यापक _ कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.