संविधान दिनानिमित्त नवगण महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन

परळी वैजनाथ : येथील नवगण महाविद्यालयामध्ये आज 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून भारतीय राज्यघटने संबंधी आणि संविधानासंबंधी विविध संदर्भ साहित्य , संविधानात्मक ग्रंथ आणि राज्यशास्त्राच्या अभ्यासाकांच्या विविध पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले. ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा. लांडगे यांच्या नियोजनातून विद्यार्थ्यांनी संविधानाची मूळ प्रत हाताळली आणि उद्देशिका वाचन केले. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. राजपांगे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथालय विभागाच्या वतीने मागील आठवड्यामध्येच विविध दर्जेदार दिवाळी अंकाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते यामध्ये मराठी साहित्यातील अभिजात कलाकृती आणि सुप्रसिद्ध असे दिवाळी अंक विद्यार्थी आणि प्राध्यापकांना उपलब्ध करून देण्यात आले. ग्रंथ प्रदर्शनास विद्यार्थी विद्यार्थिनी आणि प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.