*नवगण महाविद्यालयात केक तयार करणे संबंधीची दोन दिवशीय कार्यशाळा संपन्न*

परळी: नवगण कला व वाणिज्य महाविद्यालय परळी वैजनाथ येथील गृहशास्त्र विभागातर्फे केक बनवून त्यावरील डेकोरेशन  करणे याचे दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.
विद्यार्थ्यांना स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचे हेतूने गृहशास्त्र विभागातर्फे विविध प्रकारचे केक शिकवण्यात आले, यामध्ये चॉकलेट केक, व्हॅनिला केक, डॉल केक, आईस केक, रेड वेलवेट केक अशाप्रकारे विविध केक शिकवून त्यावर विविध प्रकारचे आयसिंग कसे करायचे याचे दोन दिवसीय कार्यशाळा महाविद्यालयामध्ये दिनांक 13 व 14 सप्टेंबर 2023 घेण्यात आली, केक प्रशिक्षक सौ.पूनम सोनवणे यांनी केक बनवणे आणि आयसिंग करणे याचे उत्तम रित्या प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले. विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या हा उद्देश या कार्यशाळे मागे होता.
या कार्यशाळेसाठी गुहशास्त्र विभागाच्या  डॉ. वंदना फटाले यांनी परिश्रम घेतले. प्राचार्य कॅप्टन डॉ मधुकर राजपांगे यांनी संबंधित कार्य शाळेसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. महाविद्यालयातल्या बहुसंख्या विद्यार्थिनींनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.

Comments

Popular posts from this blog

भाऊ : नात्यागोत्यांचे समन्वयक

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे