नवगण महाविद्यालयामध्ये आजीवन शिक्षण व विस्तार सेवा केंद्राचे उद्घाटन संपन्न

परळी वैजनाथ : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये आज आजीवन शिक्षण व विस्तार सेवा केंद्राचे उद्घाटन माजी प्राचार्य डॉ एम एस हेरकर यांच्या हस्ते संपन्न झाले

यावेळी बोलताना डॉ हेरकर म्हणाले की जीवनामध्ये केवळ डिग्री आणि शिक्षण महत्वाचे नाही तर त्यातून मिळणारा आत्मविश्वास आत्मसन्मान हाही महत्त्वाचा आहे. जीवनाला सत्यतेची धार पाहिजे. आपल्या जीवनातील शैक्षणिक अनुभवाच्या प्रदीर्घ अनुभवाच्या गोष्टी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कथन केल्या. यावेळी आजीवन शिक्षण विभागाच्या वतीने कोविड व लॉक डाऊन काळातील अनुभव या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेमध्ये परमेश्वर माणिकराव मिराशे, ऋतुजा सुरेश मोगरे, मनीषा प्रभाकर घेवारे, करण रामचंद्र पांचाळ, साक्षी विजय काकणी, खान शाहरुख हमीद इत्यादी विद्यार्थ्यांनी पारितोषिके मिळविली

यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ मधुकर राजपांगे,
उपप्राचार्य डॉ महेश दाडगे, कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रकाश फड, डॉ अनुरथ केंद्रे इत्यादींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रकाश फड यांनी केले तर सूत्रसंचालन प्रोग्राम ऑफिसर प्रा राहुल सोनवणे यांनी केले व आभार डॉ पुरी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी व प्राध्यापक याची उपस्थिती होती

Comments

Popular posts from this blog

भाऊ : नात्यागोत्यांचे समन्वयक

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे