लेखन व वाचन कौशल्यांचा तंत्रज्ञानाच्या साह्याने विकास करा : डॉ देवानंद पुरी


परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये आजीवन शिक्षण व विस्तार सेवा विभागाच्या वतीने दोन दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शक डॉ देवानंद पुरी हे बोलत होते यावेळी व्यासपीठावर प्राचार्य कॅप्टन डॉ मधुकर राजपांगे, वैद्यनाथ महाविद्यालयाचे डॉ चव्हाण, उपप्राचार्य डॉ महेश दाडगे उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ पुरी म्हणाले की आपल्या शिक्षणाचा व्यवहारिक उपयोग आणि उदरनिर्वाह साठी उपयोग करावा. सध्याच्या विविध संधी मिळवायचे असतील तर संभाषण व लेखन कौशल्य आत्मसात केली पाहिजेत व ती कॉम्प्युटर सारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने विकसित केली पाहिजेत तसेच डॉ चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या शारीरिक भावनिक व मानसिक अशा बहुआयामी व्यक्तिमत्व विकासाच्या संकल्पना स्पष्ट केल्या. तर प्राचार्य डॉ. राजपांगे यांनी केवळ नोकरीसाठी शिक्षण घेणे हे चुकीचे असून जीवन जगण्याची कौशल्य ही शिक्षणातून शिकली पाहिजेत व व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे असे मत व्यक्त केले.
तिसऱ्या सत्रांमध्ये डॉ दयानंद कुरुडे यांनी स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन केले. त्यांनी गट अ पासून ड पर्यंत विविध प्रक्रिये मध्ये विविध स्पर्धा परीक्षांच्या संधी उपलब्ध असून त्यांचा सामना कसा करावा याचे बहुमूल्य मार्गदर्शन केले. चौथ्या सत्रामध्ये प्रा. बबन झांजे यांनी विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन ऍक्टिव्हिटी विषयी चर्चा केली. कमी भांडवलातून उद्योग कसा उभा करावा व तो कसा यशस्वी करावा याचा सल्ला दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश व प्रा राहुल सोनवणे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार डॉ सूर्यकांत देशमुख, डॉ उमाकांत वानखेडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

भाऊ : नात्यागोत्यांचे समन्वयक

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे