नवगण महाविद्यालयात राष्ट्रीय पोषण माह निमित्त विविध कार्यक्रम आयोजित

नवगण कला व वाणिज्य महाविद्यालय परळी येथील गृहशास्त्र विभाग आणि एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत येणाऱ्या परळी शहरातील सर्व अंगणवाडीयांच्या वतीने राष्ट्रीय पोषण माह निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले होते. या संपूर्ण महिनाभरामध्ये विविध ठिकाणच्या अंगणवाड्यांमध्ये आणि परिसरातील महिला व किशोर वयीन मुलींच्या आहार व आरोग्य विषयक समस्या, गर्भवती स्त्रियांचे पोषण, मध्यप्रौढावस्थेतील आजार आणि आहार, जीवनामध्ये भरड धान्यांचे महत्त्व अशा विविध पोषण विषय जनजागृती कार्यक्रम घेतल्या गेले.
 पोषण महानिमित्त उद्घाटन पर प्रसंगी सौ संध्या देशमुख या अध्यक्ष होत्या त्यांनी प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहाराचे महत्त्व आणि विविध आजारांवर कशी मात करता येते याबद्दल उत्कृष्ट मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंगणवाडी ताई देशमुख यांनी केले. नवगण महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ.  वंदना फटाले मॅडम यांनी मध्यप्रौढावस्था आणि आहारातील बदल  या विषयी मार्गदर्शन केले. यावेळी अंगणवाडी सुपरवायझर सोमानकर मॅडम या होत्या.
     पोषण महासमारोप  याप्रसंगी नगरपालिका सीओ. श्री कांबळे सर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विविध अंगणवाड्यातील अंगणवाडी ताईं यांनी पाककलेतील  उत्कृष्ट पोषण आपल्या पाककलेच्या  पदार्थांमधून निदर्शनास आणून दिले.
   जीवनामध्ये भरड धान्य, आहारामध्ये भरड धान्यांचे महत्त्व आणि विविध आजारांवर मात याविषयी फटाले मॅडम यांनी मार्गदर्शन केले. परळी पोलीस स्टेशनच्या सौ सुनीता नरंगलकर मॅडम यांनी महिलां आणि जागरूकता यावर उत्कृष्ट मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ राजपांगे ,अंगणवाडी सुपरवायझर सौ.मानकर मॅडम,
 मोहोड मॅडम, अंगणवाडीतील गीते यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

भाऊ : नात्यागोत्यांचे समन्वयक

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे