Posts

आ.विक्रम काळे यांच्या हस्ते डॉ.मधुकर आघाव यांचा नवगण महाविद्यालयाच्या प्राचार्यपदीनिवडीबद्दल सत्कार

Image
वैजनाथ (प्रतिनिधी) :- शिक्षक मतदार संघाचे आ.विक्रम काळे यांच्याहस्ते नवगण महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ मधुकर आघाव यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.                 नवगण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये गेल्या 28 वर्षापासून प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे डॉ मधुकर आघाव यांची नुकतीच महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. सोमवार दि. १६ सप्टेंबर रोजी शिक्षक मतदार संघाचे आ.विक्रम काळे यांनी डॉ.मधुकर आघाव सर यांच्या प्राचार्यपदी नियुक्तीबद्दल पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, माजी नगरसेवक चेतन सौदळे व इतर उपस्थितीत होते. तसेच  शिक्षक मतदार संघाचे आ.विक्रम काळे यांनी नवगण महाविद्यालय येथे भेट दिल्याबद्दल प्राचार्य  डॉ मधुकर आघाव यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थिती होते.

21 व्या शतकात ज्ञान हेच भांडवल: प्राचार्य डॉ. मधुकर आघाव

Image
परळी वैजनाथ:  येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ आघाव बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की जुन्या काळातील युद्धाचे साहित्य आज वापरून चालणार नाही आज माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे लढाईची साधने बदललेली आहेत. ज्ञान हे मुख्य भांडवल आहे, ज्ञान हेच हत्यार आहे. या नवयुगातील ज्ञानात्मक साधनांचा आपण उपयोग करायला शिकले पाहिजे. महाविद्यालयांमध्ये यावेळी शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी भाषणे केली तसेच डॉ आघाव यांची नुकतीच प्राचार्य पदी नियुक्ती केल्यामुळे महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने आणि विद्यार्थ्यांतर्फे त्यांचा स्वागत सत्कार करण्यात आले. यावेळी परळी शहर आणि परिसरातील राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांनीही डॉ आघाव यांच्या निवडीबद्दल सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपप्राचार्य डॉ लालासाहेब घुमरे व डॉ दयानंद कुरुडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना लेखणीची भ

नवगण महाविद्यालयात विद्यापीठ वर्धापन दिन साजरा

Image
परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ , छत्रपती संभाजीनगरचा 66 वा विद्यापीठ वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ मधुकर आघाव यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले तर क्रीडा संचालक डॉ रवींद्र मचाले यांच्यावतीने ध्वज संचालन करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ लालासाहेब घुमरे , सर्व विभागांचे विभाग प्रमुख व महाविद्यालयातील कर्मचारी, प्राध्यापक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी करत शिक्षणाची संधी उपलब्ध __प्राचार्य डॉ मधुकर आघाव

Image
परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र असून येथे बीए, बीकॉम व एमबीए करण्यासाठी विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी आहे तरी विद्यार्थ्यांनी या शिक्षणाचा लाभ घ्यावा व प्रवेशासाठी संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मधुकर आघाव यांनी केले आहे. नवगण महाविद्यालयामध्ये मुक्त विद्यापीठासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकांची सुविधा देण्यात येते तसेच मार्गदर्शन वर्ग देखील घेण्यात येतील त्याचप्रमाणे नोकरी करत असताना दर्जेदार शिक्षण व पदवी मिळविण्याचे ही सुवर्णसंधी आहे. ग्रामीण भागातील अर्धवेळ नोकरी करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा व प्रवेशासाठी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेशासाठी आपण  डॉ आघाव 9423844444 डॉ मोहिते 9421339343 डॉ आचार्य 9423716114 डॉ वानखेडे 9421336952 डॉ धायगुडे 9850734463 डॉ शिरसाट 9511874921 डॉ घुमरे 9823567335 श्री साखरे 9423471921 यांच्याशी संपर्क साधावा.

नवगण महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

Image
परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला यावेळी स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य डॉ अनिल घुगे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, स्थानिक सल्लागार समितीचे नवनिर्वाचित सदस्य चंद्रकांत शंकर आप्पा उदगीरकर, माजी प्राचार्य डॉ आर एस बांगड, प्राचार्य डॉ कॅप्टन मधुकर राजपांगे, प्राचार्य डॉ. मधुकर आघाव, नगरसेवक श्री चेतन सौंदळे, माजी उपप्राचार्य प्रा बोबडे आर के इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संगीत विभागाच्या वतीने प्रा जोशी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली देशभक्तीपर गीत गायन करण्यात आले तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महाविद्यालय कॅम्पस मध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. हे महाविद्यालय म्हणजे परळी शहरातील निसर्गरम्य असे शैक्षणिक पर्यटन स्थळ असल्याचे मत यावेळी प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केले. वृक्षारोपण कार्यक्रमासाठी एनएसएसचे कार्यक्रमाधिकारी डॉ प्रशांत साबळे, सहकार्यक्रम अधिकारी डॉ मोहिते सर इत्यादींसह महाविद्य

नवगण महाविद्यालय परळी च्या स्थानिक सल्लागार सदस्य पदी चंद्रकांत शंकर आप्पा उदगीरकर यांची नियुक्ती

Image
परळी वैजनाथ : येथील प्रसिद्ध  सामाजिक कार्यकर्ते तथा व्यापारी चंद्रकांत शंकर आप्पा उदगीरकर  यांची नवगण महाविद्यालय परळी वैजनाथचे स्थानिक सल्लागार सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यासंबंधीचे अधिकृत नियुक्तीपत्र प्राचार्य डॉ मधुकर आघाव यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ एल बी घूमरे, डॉ फड, डॉ प्रशांत साबळे, मुख्य लिपिक श्री नरेश आप्पा साखरे इत्यादींची उपस्थिती होती. महाविद्यालयाची नवीन शैक्षणिक धोरणातील वाटचाल आणि विकास यासंबंधी श्री उदगीरकर यांच्याकडून चांगले मार्गदर्शन मिळेल असे मत यावेळी डॉ मधुकर आघाव यांनी व्यक्त केले. श्री उदगीरकर यांच्या निवडीबद्दल परळी शहरातील सर्व मित्र मंडळ आणि नवगण महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

नवगण महाविद्यालयात एकदिवसीय राखी प्रशिक्षण कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
परळी वैजनाथ: येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये राखी पौर्णिमेनिमित्त आज दिनांक 13  रोजी एकदिवसीय राखी प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ मधुकर आघाव यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सण समारंभाच्या निमित्ताने आपली संस्कृती आणि त्यामागील कलाकुसर शिकून घ्यावी असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. गृहशास्त्र विभागाच्या वतीने हा मोफत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विभाग प्रमुख डॉ चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा जोशी, प्रा उजमा, प्रा डागा इत्यादींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. विशेषतः या कार्यक्रमांमध्ये मुस्लिम विद्यार्थिनींनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदविला त्याचे सर्व प्राध्यापक वृंदांच्या वतीने कौतुक करण्यात आले. उत्कृष्ट राखी कलाकुसर करणाऱ्या विद्यार्थिनींचा यावेळी महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.