नवगण महाविद्यालयात एकदिवसीय राखी प्रशिक्षण कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

परळी वैजनाथ: येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये राखी पौर्णिमेनिमित्त आज दिनांक 13  रोजी एकदिवसीय राखी प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ मधुकर आघाव यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सण समारंभाच्या निमित्ताने आपली संस्कृती आणि त्यामागील कलाकुसर शिकून घ्यावी असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. गृहशास्त्र विभागाच्या वतीने हा मोफत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विभाग प्रमुख डॉ चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा जोशी, प्रा उजमा, प्रा डागा इत्यादींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. विशेषतः या कार्यक्रमांमध्ये मुस्लिम विद्यार्थिनींनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदविला त्याचे सर्व प्राध्यापक वृंदांच्या वतीने कौतुक करण्यात आले. उत्कृष्ट राखी कलाकुसर करणाऱ्या विद्यार्थिनींचा यावेळी महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे

शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी करत शिक्षणाची संधी उपलब्ध __प्राचार्य डॉ मधुकर आघाव