नवगण महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला यावेळी स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य डॉ अनिल घुगे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
यावेळी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, स्थानिक सल्लागार समितीचे नवनिर्वाचित सदस्य चंद्रकांत शंकर आप्पा उदगीरकर, माजी प्राचार्य डॉ आर एस बांगड, प्राचार्य डॉ कॅप्टन मधुकर राजपांगे, प्राचार्य डॉ. मधुकर आघाव, नगरसेवक श्री चेतन सौंदळे, माजी उपप्राचार्य प्रा बोबडे आर के इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी संगीत विभागाच्या वतीने प्रा जोशी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली देशभक्तीपर गीत गायन करण्यात आले तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महाविद्यालय कॅम्पस मध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. हे महाविद्यालय म्हणजे परळी शहरातील निसर्गरम्य असे शैक्षणिक पर्यटन स्थळ असल्याचे मत यावेळी प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केले. वृक्षारोपण कार्यक्रमासाठी एनएसएसचे कार्यक्रमाधिकारी डॉ प्रशांत साबळे, सहकार्यक्रम अधिकारी डॉ मोहिते सर इत्यादींसह महाविद्यालय कर्मचारी व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.

Comments

Popular posts from this blog

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे

शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी करत शिक्षणाची संधी उपलब्ध __प्राचार्य डॉ मधुकर आघाव