नवगण महाविद्यालयात विद्यापीठ वर्धापन दिन साजरा


परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ , छत्रपती संभाजीनगरचा 66 वा विद्यापीठ वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ मधुकर आघाव यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले तर क्रीडा संचालक डॉ रवींद्र मचाले यांच्यावतीने ध्वज संचालन करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ लालासाहेब घुमरे , सर्व विभागांचे विभाग प्रमुख व महाविद्यालयातील कर्मचारी, प्राध्यापक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

मराठी साहित्यातील जाणिवा (विशेष संदर्भ 2000 नंतरचे साहित्य)

सूत्रसंचालन कसे करावे भाग १