नवगण महाविद्यालय परळी वैजनाथ येथे नवीन विज्ञान शाखेच्या (B.Sc) प्रवेशासाठी मंजुरी
परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाची 1993 पासून यशस्वी वाटचाल सुरू असून सन 2024 पासून विज्ञान शाखेला देखील शासनाने मंजुरी दिली आहे. बीएससी साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ही सुवर्णसंधी आहे.
महाराष्ट्र शासनाने नुकत्याच मंजूर केलेल्या नवीन महाविद्यालय आणि नवीन तुकडीच्या यादीमध्ये येथील नवगण महाविद्यालयाला बीएससी विद्याशाखा सुरू करण्याची परवानगी दिली असून केमिस्ट्री, बायोलॉजी ,फिजिक्स या सोबतच मॅथेमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, बायो केमिस्ट्री, ऍनालिटीकल केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री, बायो केमिस्ट्री, एन्व्हायरमेंट सायन्स, बॉटनी, झुलाजी यासारख्या नाविन्यपूर्ण विषयासाठी ऍडमिशन घेता येईल. परळी सारख्या शहरांमध्ये वरील नवीन विषयांमध्ये अभ्यास करण्याची प्रथमच संधी मिळत आहे असे मत नवगण महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ मधुकर राजपांगे व उपप्राचार्य डॉ लालासाहेब घुमरे यांनी व्यक्त केले. नवीन विद्याशाखे मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्याशी संलग्न असलेल्या नवगण महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी श्री साखरे (9423471921) यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment