नवगण महाविद्यालय परळी च्या स्थानिक सल्लागार सदस्य पदी चंद्रकांत शंकर आप्पा उदगीरकर यांची नियुक्ती

परळी वैजनाथ : येथील प्रसिद्ध 
सामाजिक कार्यकर्ते तथा व्यापारी
चंद्रकांत शंकर आप्पा उदगीरकर 
यांची नवगण महाविद्यालय परळी वैजनाथचे स्थानिक सल्लागार सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यासंबंधीचे अधिकृत नियुक्तीपत्र प्राचार्य डॉ मधुकर आघाव यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ एल बी घूमरे, डॉ फड, डॉ प्रशांत साबळे, मुख्य लिपिक श्री नरेश आप्पा साखरे इत्यादींची उपस्थिती होती. महाविद्यालयाची नवीन शैक्षणिक धोरणातील वाटचाल आणि विकास यासंबंधी श्री उदगीरकर यांच्याकडून चांगले मार्गदर्शन मिळेल असे मत यावेळी डॉ मधुकर आघाव यांनी व्यक्त केले. श्री उदगीरकर यांच्या निवडीबद्दल परळी शहरातील सर्व मित्र मंडळ आणि नवगण महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे

शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी करत शिक्षणाची संधी उपलब्ध __प्राचार्य डॉ मधुकर आघाव