डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन
परळी वैजनाथ : नवगण शिक्षण संस्थेचे सचिव तथा बीड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी शहरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. प्रा.शिल्पा मुंडे युवती तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परळी व सोफिया बाबू नंबरदार, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी परळी वैजनाथ इत्यादींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. यामध्ये शहरातील अनेक मुलींनी सहभाग नोंदविला. आकर्षक रांगोळी सजावट, रंग योजना, सामाजिक संदेशाची मांडणी या आधारावर मुलींना योग्य ती पारितोषिके देण्यात आली. रांगोळी स्पर्धेच्या आयोजनामध्ये प्रोफेसर डॉ वंदना फटाले , उर्दू विभागाच्या प्रमुख प्रा. अफिया उजमा, प्रोफेसर डॉ अर्चना परदेशी, प्रा. सोनाली जोशी, प्रसिद्धीविभाग प्रमुख डॉ बापू घोलप, डॉ दयानंद कुरुडे इत्यादींनी परिश्रम घेतले तसेच नवगण महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हा उप रुग्णालयांमध्ये रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या स्थानिक सल...