Posts

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत संगीत अभंगवाणी कार्यक्रम संपन्न

Image
परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये संगीत विभागाच्या वतीने अभंगवाणीचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ एल बी घुमरे , विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ महेश दाडगे इत्यादींची उपस्थिती होती. साहित्य, संगीत इत्यादी सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी महत्त्वाचे योगदान दिलेले आहे त्यांना शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी सुदर्शन शिंदे, गणेश नाथ पांचाळ, प्रा राहुल सोनवणे, प्रा महेश दाडगे, प्रा प्रकाश फड, प्रा. सोनाली जोशी इत्यादींनी विविध मराठी अभंग आणि गवळणींचे गायन करून अभंगवाणीचा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ डी एस पुरी यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. बापूजी घोलप यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी आणि संगीत प्रेमी प्राध्यापकांची उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे

Image
परळी वैजनाथ : नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर मौजे नागापूर येथे 14 ते 20 फेब्रुवारी मध्ये संपन्न होत आहे त्याच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक परळी येथील रेडिओलॉजिस्ट डॉ अनिल कुमार घुगे हे बोलत होते यावेळी व्यासपीठावर उद्घाटक श्री बाळासाहेब देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. मधुकर राजपांगे, उपप्राचार्य डॉ. लालासाहेब घुमरे, नागापूरच्या सरपंच मंगलताई रमेश तोंडारे , संतोष सोळंके, मोहन सोळंके, परमेश्वर सोळंके, कुंडलिक सोळंके, कैलास सोळंके इत्यादींची उपस्थिती होती.  यावेळी बोलताना डॉ. घुगे म्हणाले की विद्यार्थ्यांना चटपटीत खाण्याचे आणि कोल्ड्रिंक्स वगैरे रासायनिक पेय पिण्याचे व्यसन लागले आहे त्याचप्रमाणे मोबाईलचे व्यसन हे देखील आरोग्यास घातक आहे. यापासून विद्यार्थ्यांनी दूर राहिले पाहिजे.  यावेळी नवगण महाविद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य बाळासाहेब देशमुख यांनी नागापूरच्या नागरिकांचा आणि नवगण महाविद्यालयाचा फार जुना संबंध असून महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी येथे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात ...

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त नवगण महाविद्यालयात महिला तक्रार निवारण समितीचा कार्यक्रम संपन्न

Image
परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये संस्थेचे सचिव तथा बीड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच भाग म्हणून आज महिला तक्रार निवारण समितीच्या वतीने महिलांच्या संरक्षणार्थ करण्यात आलेले कायदे या विषयावर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम.जी राजपांगे हे होते तर एडवोकेट शोभा लोमटे ह्या प्रमुख मार्गदर्शक होत्या. यावेळी बोलताना एडवोकेट लोमटे म्हणाल्या की कायदा स्त्री आणि पुरुष सर्वांना समान असतो तसेच आधुनिक काळामध्ये स्त्रियांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कायद्याने सक्षम अशा प्रकारचे उपाययोजना केली आहे त्याची जाणीव जागृती महिला व मुलींमध्ये झाली पाहिजे. सौ कमल बरुडे यांनी लीनेस क्लब च्या वतीने करण्यात येणारे महिला विषयक कार्य आणि उपक्रम यांची माहिती दिली तर डॉ. राजपांगे यांनी पुरुषांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारासाठी ही महिला प्रमाणेच कायदे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले व ततसंबंधी काही उदाहरणे दिली.यावेळी गयाताई कराड, ...

नवगण महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

Image
परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ मधुकर राजपांगे, उपप्राचार्य डॉ. एल बी घुमरे इत्यादींसह कनिष्ठ महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ. राजपांगे म्हणाले की पूर्व पिढीच्या अनुभवाचा  विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा व अभ्यासक्रमासोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करावी व नीती संपन्न जीवन जगावे. तर उपप्राचार्य डॉ घुमरे यांनी विद्यार्थ्यांची महाविद्यालयात होणारी उपस्थिती आणि उपक्रमशीलता वाढली पाहिजे अशा अपेक्षा व्यक्त केल्या तसेच यावेळी डॉ दयानंद कुरडे व प्रा वाघमारे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शेख मुसाफिर, आरती वाघमारे, शेख अमीर, स्वामी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बापू घोलप यांनी व्यक्त केले तर आभार प्रा. जोशी मॅडम यांनी व्यक्त केले

महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन नवीन पद्धतीनुसार, जून 2024 पासून होणार अंमलबजावणी.

Image
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - 2020 मध्ये नॅक, एन. बी. ए., एन. आय. आर. फ. अश्या सर्व  मूल्यांकन संस्थांच्या प्रक्रियेमध्ये समानता अथवा बदल करण्याचे प्रस्तावित होते, त्यामधील नॅकच्या अनुषंगाने गठीत इस्रो चे माजी अध्यक्ष डॉ. राधाकृष्णन समितीचा अहवाल केंद्रीय मंत्री मा. धर्मेंद्र प्रधान यांनी १६ जानेवारी २०२४ रोजी स्वीकारला असून, २७ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या नॅक च्या बैठकीत ही प्रक्रिया अंमलबजावणीच्या दृष्टीने चर्चा झाली आणि जून २०२४ पासून ही मूल्यांकन प्रक्रिया लागू करण्याचे ठरले. नवीन मूल्यांकनामध्ये आमुलाग्र बदल होणार असून, आत्ता अस्तित्वात असलेली आणि ज्या मुळे महाविद्यालयामध्ये निरर्थक स्पर्धा असायची अशी ग्रेड पद्धत (C ते A++) बंद होणार आहे, आता फक्त त्या महाविद्यालयाचे मूल्यांकन झाले अथवा नाही (बायनरी) एवढाच भाग असणार आहे. नॅक साठी माहिती सादर करण्याची प्रक्रिया सोपी करणेत आली असून, One Nation One Data या प्लॅटफॉर्म चा सदर मूल्यांकन प्रक्रियेमध्ये महत्वाचा भाग असणार आहे, महाविद्यालयांना नॅक साठी आवश्यक असणारा डाटा हा या प्लॅटफॉर्म वर ठेवावा लागणार आहे, जेणेकरून प्रत्यक्ष...

भारताची महासत्तेकडील वाटचाल

*उप विषय* 1. भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल 2. जी 20 3. कृषी क्षेत्रातील बदल (नवीन योजना) 4. सेवा क्षेत्रातील बदल 5. उद्योग क्षेत्रातील बदल 6. आरोग्य क्षेत्रातील बदल 7. शिक्षण क्षेत्रातील बदल नवीन शैक्षणिक धोरण 2020 8. संरक्षण क्षेत्रातील बदल : युद्ध निती 9. भारताच्या परराष्ट्र धोरनातील बदल 10. अंदाजपत्रकातील बद्दल 11. कर प्रणालीत झालेला बदल 12. भारताचे शेजारच्या राष्ट्राशी व इतर देशांशी असलेले संबंध (आर्थिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक इ.) 13. व्यापार व बाजार व्यवस्थेत झालेले बदल 14. भारत व जागतिक संघटना 15. बॅंकिंग क्षेत्रात झालेले बदल 16. आयात निर्यातातून भारताची महासत्तेच्या दिशेने होणारी वाटचाल 17. जी डी पी आणि वित्तीय तूट पूर्वी आता 18. अंतराळ क्षेत्रात भारताची प्रगती 19. राज्य घटनेला होत असलेली 75 वर्ष 20. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी व समतोल राखण्यासाठी झालेले बदल 21. विविध भाषेतील साहित्य निर्मिती वर झालेले बदल 22.भारतीयांच्या राहणीमान व उपजीविकेवर झालेले बदल 23. सामाजिक परिस्थिती व समाजमनावर झालेले बदल 24. राजकारण व राजकीय समस्यांनमधील बदल 25. आय टी क्षेत्रातील बदल 26. विविध का...

नवगण शिक्षण संस्था राजूरीचे कला व वाणिज्य महाविद्यालय परळी. वै. येथे मतदार दिन साजरा

Image
परळी वैजनाथ : येथील कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ लालासाहेब घुमरे व प्रमूख वक्ते नवगण कला व वाणिज्य महाविद्यालय परळी वै. इंग्रजी विभागाचे प्रा. पुरी डि एस. उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. वानखेडे यू.डी. यांनी केले. आपला प्रास्ताविकपर भाषणात प्रा.डॉ. वानखेडे यू.डी. म्हणाले की, लोकशाही सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करणे अत्यंत महत्वाचे आहे. यानंतर प्रमूख वक्ते प्रा. पुरी.डि.एस म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपले नांव मतदार यादीत नोंदविणे अत्यंत महत्वाचे आहे. लोकशाहीत मताला अमूल्य किमत आहे. त्यामूळे मतदाना पासून कोणीही वंचीत राहू नये. कार्यक्रमाचा समारोप प्राचार्य डॉ मधूकर राजपांगे यांनी केला. अध्याक्षिय समारोपात प्राचार्य डॉ. राजपागे एम.जी. म्हणाले की देशाच्या विकासात विका‌सात मतदारांची भूमिका फार महत्वपूर्ण असते. या कार्यक्रमात मतदान ओळखपत्र प्राप्त झालेली विद्यार्थीनी कु. ऋतुजा मोगरे यांना ओळखपत्र देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा. सोनवण...